Pune : पुण्याचे सह आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्त पदी बदली

एमपीसी न्यूज – राज्याच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील(Pune) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि. 21) बदल्या केल्या. त्यामध्ये पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिक येथे पोलीस आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.

माजी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग(Pune) मुंबई येथे बदली झाली. त्यांच्या जागी संदीप कर्णिक एप्रिल 2022 मध्ये पुणे येथे सह पोलीस आयुक्त म्हणून आले होते. संदीप कर्णिक यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून पूर्वी काम केले होते. दोन वर्षांची टर्म संपण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे सह पोलीस आयुक्त म्हणून अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.

Railway : छठ पूजेसाठी पुणे – मुजफ्फरपुर विशेष रेल्वे

नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विभाग व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची वर्णी लागली आहे. अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून त्यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती.

अंकुश शिंदे यांची यांची देखील नाशिक येथील कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली. पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त असताना देखील कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.