Railway : छठ पूजेसाठी पुणे – मुजफ्फरपुर विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – छठ पूजा उत्सवानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून(Railway) पुणे – मुजफ्फरपुर दरम्यान विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे.
रेल्वे क्रमांक 05286 पुणे – मुजफ्फरपुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस गुरुवारी (दि. 23) आणि (दि. 30 नोव्हेंबर) रोजी पुणे येथून रात्री 11.00 वाजता सुटेल. ही गाडी शनिवारी सकाळी 06.00 वाजता मुजफ्फरपुर येथे पोहचेल.
रेल्वे क्रमांक 05285 मुजफ्फरपुर – पुणे सुपरफास्ट(Railway) विशेष एक्सप्रेस बुधवारी (दि. 22) आणि (दि. 29 नोव्हेंबर) रोजी मुजफ्फरपुर येथून दुपारी 01.00 वाजता सुटेल. ही गाडी गुरुवारी रात्री 09.00 वाजता पुणे येथे पोहचेल.
Bhosari: पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
ही गाडी दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र आणि हाजीपुर स्थानकांवर थांबेल.
या गाडीला एसी फर्स्ट एक, एसी थ्री 11, एसी टू 2, पॅंट्री एक, जनरेटर कार दोन असतील. रेल्वे क्रमांक 05286 ची बुकिंग 22 नोव्हेंबर रोजी सरू होईल.