Dighi : सराईत वाहन चोरट्यांना अटक; सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – दिघी पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख 55 हजार रुपयांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

नासिर उर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख (वय 36, रा. चऱ्होली खुर्द, ता. हवेली), मनोज मेहतर सोंदरकर (वय 40, रा. मरकळ, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रामदास मुकणे यांना माहिती मिळाली की, दाभाडे सरकार चौकाजवळ एकजण चोरीची दुचाकी घेऊन आला आहे. त्यानुसार दिघी पोलिसांनी परिसरात सापळा लाऊन मनोज सोंदरकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने ती दुचाकी बाबा मिस्त्री याच्याकडून खरेदी केली असल्याचे सांगितले.

Alandi:ॲड राजेंद्र उमाप ,योगी निरंजन नाथ ,डॉ. भावार्थ देखणे आळंदी देवस्थान विश्वस्त पदी

बाबा मिस्त्री बाबत माहिती काढून पोलिसांनी त्याला पगडे वस्ती, आळंदी येथून ताब्यात घेतले. मनोज सोंदरकर आणि बाबा मिस्त्री या दोघांकडून पोलिसांनी एकूण तीन लाख 55 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील चार, भोसरी, पिंपरी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक असे एकूण वाहन चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.