PCMC : दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या 18 सदस्यीय(PCMC) कोअर टीमसाठी दिल्लीत तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या अभ्यास दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोअर टीमने मुख्यत्वे दिल्लीची शैक्षणिक व्यवस्था व तेथील मार्गदर्शक-शिक्षक मॉडेल तसेच व्यावसायिक शिक्षण संस्थांना भेट देऊन तेथील पायाभूत सुविधा, प्रशासन, शिक्षक आणि मुख्याध्यापकांची क्षमता आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल अभ्यासपुर्ण माहिती समजून घेतली.दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास मदत मिळेल असा विश्वास जांभळे यांनी व्यक्त केला.

Alandi:ॲड राजेंद्र उमाप ,योगी निरंजन नाथ ,डॉ. भावार्थ देखणे आळंदी देवस्थान विश्वस्त पदी

या अभ्यास दौऱ्यात सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, (PCMC)सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात तसेच मुख्याध्यापक, शिक्षक यांचा समावेश होता. दिल्ली अभ्यास दौऱ्यावेळी तेथील शालेय शिक्षण मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) मधील महत्त्वाच्या शिक्षण अधिकार्‍यांशीही महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.

आयुक्त शेखर सिंह दौऱ्याबाबत बोलताना म्हणाले, दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास मदत मिळणार आहे. या अभ्यासपूर्ण दौऱ्याचा अनुभव कोअर टीमला महापालिका शाळांमध्ये प्रभावी धोरणे आखण्यासाठी आणि नवकल्पना लागू करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा सहयोगी प्रयत्न निःसंशयपणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल.

कोअर टीमचे सदस्य तौसीफ परवेझ म्हणाले, आमचा भर केवळ शैक्षणिक दर्जा वाढवण्यावर नाही तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवातील गुंतागुंत समजून घेण्यावरही होता. आम्ही दिल्लीच्या सार्वजनिक शाळांमध्ये सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देत शैक्षणिक कार्यपद्धतीला आकार देण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या भूमिकांचा अभ्यास केला.

माध्यमिक विद्यालय लांडेवाडीच्या सहाय्यक शिक्षिका तसेच कोअर टीमच्या सदस्या चारुशीला फुगे म्हणाल्या, दिल्ली शिक्षण विभागाने सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची व्यावसायिक आणि संभाव्य कौशल्ये विकसित करण्यासाठी काही उपाययोजना राबविल्या आहेत. या अभ्यास दौऱ्यात आम्हाला त्या उपाययोजना जवळून पाहता आल्या.

जाधववाडी बॉईज स्कूलमधील मनिषा सदावर्ते म्हणाल्या, चार-पाच वर्षांपूर्वी दिल्लीतील सरकारी शाळांचे चित्र खूप वेगळे होते, परंतु तेथील प्रत्येक शिक्षकाने स्वत: जबाबदारी घेतली आणि मुलांमध्ये आणि शाळेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. दिल्लीतील शाळांमधील शिक्षकांसोबत पालक आणि अधिकारीही महत्त्वाची भूमिका बजावतात. महापालिका शाळांमध्येही असाच बदल घडावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.