Pune : छेडछाडीच्या तक्रारीसाठी पुणे पोलीस आयुक्तांनी जाहीर केला व्हॉटसअप क्रमांक

एमपीसी न्यूज – मध्यतंरी भर रस्त्यात तरुणीवर झालेले वार किंवा रस्त्यात तरुणींना अडवून केली जाणारी छेडछाड याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे पोलिसांनी एक ( Pune ) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी तक्रार नोंदवण्यासाठीचा व्हॉटसॲप क्रमांक जाहीर केला आहे.

कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास शाळकरी मुली, तरुणी, तसेच नागरिकांनी थेट व्हॉटसॲप क्रमांक 8975953100 यावर तक्रार करावी. तातडीची मदत हवी असल्यास किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात (संपर्क क्रमांक- 112) तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

Pune : लष्करातील जवानाला मारहाण करत लुटले

शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून त्यानुसार कारवाई करण्यासाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. एखादी अनुचित घटना आढळून आल्यास नागरिक तक्रार करू शकतात. नागरिकांची तक्रार पोलिस ठण्यात, दामिनी पथक आणि गुन्हे शाखेला कळवून तातडीने कारवाई करण्यात ( Pune ) येईल. पोलिस आयुक्त रितेश कुमार स्वत: हेल्पलाईनवर लक्ष ठेवणार आहेत, असे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.