Pune : लष्करातील जवानाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज –  लष्करातील जवानाला मारहाण करुन लुटल्याची घटना घोरपडी येथील ( Pune ) सोपानबाग परिसरात घडली.

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून परशुराम बसप्पा नगराळे (वय 39) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नगराळे हे आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये चालक आहेत. ते घोरपडीतील सोपानबाग परिसरातून सायकलवरुन निघाले होते.  चोरटे सोपानबाग परिसरातील सुरक्षारक्षक मोहित साकेत याला अडवून मारहाण करत होते. चोरट्यांनी साकेतला धमकावून लुटण्याचा देखील प्रयत्न केला. नगराळे यांनी लूटमारीचा प्रकार पाहिला आणि चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी;आरोपीला महाड येथून अटक

चोरट्यांनी नगराळे यांना दगड फेकून मारला. त्यांना चाकूचा धाक दाखवला. नगराळे यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून घेतला.सुरक्षारक्षक साकेत याला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून घेतला. चोरट्यांनी दोन मोबाइल संच, रोकड असा 17 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. पोलीस उपनिरीक्षक शितोळे तपास करत ( Pune )आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.