Maharashtra : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी;आरोपीला महाड येथून अटक

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे  आणि सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात (Maharashtra) आली आहे.  छगन भुजबळ यांना आलेल्या एका धमकी कॉल ने सर्वांचीच झोप उडाली. “मी तुमच्या नावाची सुपारी घेतली असून उद्याच तुमचं बरं वाईट करणार आहे” अशी धमकी देणारा एक फोन छगन भुजबळांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर आला होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही धमकी आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत महाड येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.

Pavana Dam update : चोवीस तासात 8 मिमी पाऊस; धरण  30 टक्क्यांवर

मंत्री छगन भुजबळ हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री त्यांचा मुक्काम पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी होता. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर प्रशांत पाटील नावाच्या तरुणाचा फोन आला. त्याने “मी तुमची सुपारी घेतली असून उद्या तुमचे बरे वाईट करणार आहे” अशी धमकीच थेट छगन भुजबळ यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्य ओळखत तांत्रिक तपास केला आणि पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या तरुणाला महाडीतून कादरी घेतले. पुणे पोलिसांचे पथक त्याला पुण्याच्या दिशेने घेऊन येत आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले असल्याचे समोर येत आहे. आरोपी तरुण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवाशी असून तो ऑपरेटर म्हणून काम करतो. गुगलवर सर्च करून त्याने भुजबळांच्या पीएचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि ही कृती केल्याची माहिती समोर येत आहे. त्याला पुण्यात आल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता (Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.