Pune : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. विवेक देबरॉय यांना भांडारकर स्मृती पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. विवेक देबरॉय यांना भांडारकर स्मृती पुरस्कार जाहीर (Pune) करण्यात आला आहे.डॉ. विवेक देबरॉय अर्थतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक आहेत.त्यांनी महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे भाषांतर केले आहे.

Pune : छेडछाडीच्या तक्रारीसाठी पुणे पोलीस आयुक्तांनी जाहीर केला व्हॉटसअप क्रमांक

भांडारकर प्राच्यविद्या संशाेधन संस्थेच्या वतीने यंदाचा सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर स्मृती  पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.एक लाख रुपये, मानपत्र आणि भांडारकरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप  आहे.भांडारकर संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृह येथे गुरुवारी (13 जुलै) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार  आहे.पुरस्कार प्रदान कार्यक्रमात संशोधनात्मक काही पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी ही माहिती (Pune)  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.