Chhagan Bhujbal : शरद पवार किंवा त्यांचे कुटुंबीय असे धमकी देण्याचे काम करीत नाही – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज -शरद पवार किंवा त्यांचे कुटुंबीय असे धमकी (Chhagan Bhujbal) देण्याचे काम करीत नाही ,असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले आहे.छगन भुजबळ यांना काल जीवे  मारण्याची धमकी देण्यात आली होती ,यासंदर्भात ते बोलत होते.

Pune : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. विवेक देबरॉय यांना भांडारकर स्मृती पुरस्कार जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ हे दोन दिवसीय पुणे दौर्‍यावर आहेत.त्याच दरम्यान त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत महाड येथून  प्रशांत दशरथ पाटील या आरोपीला अटक केली आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली .

या प्रकरणी छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की,माझ्या सहकाऱ्याने मला धमकी आल्याचे सांगितले.त्या बाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काही तासात आरोपीला महाड येथून ताब्यात घेतले आहे.आरोपीकडे चौकशी केल्यावर अधिक माहिती समोर येईल.पण मी कार्यकर्त्यांना एकच सांगेन की,शरद पवार किंवा त्यांचे कुटुंबीय असे धमकी (Chhagan Bhujbal) देण्याचे काम करीत नाही.वैचारिक लढाई ही सुरु असते. ही अशी कामे अतिउत्साही लोक करत असतात .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.