PCMC : अव्यंग व्यक्तीने दिव्यांगाशी विवाह केल्यास पालिका देणार 1 लाख रुपये

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास ( PCMC) विभागामार्फत विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गत पंडीत दीनदयाल उपाध्याय-दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत प्रती महिना 2 हजार पाचशे रुपये, संत गाडगे महाराज-दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी 1 लाख रुपये एकदाच तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित जोडप्यास 2 लाख रुपये एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

Chhagan Bhujbal : शरद पवार किंवा त्यांचे कुटुंबीय असे धमकी देण्याचे काम करीत नाही – छगन भुजबळ

पंडित दिनदयाल उपाध्याय 1 ली ते वय वर्ष 18 पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्वरुपात दरमहा 2 हजार रुपये, 5 वी ते 18 वर्षे वयोगटातील दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग मुलांमुलींना दरमहा 3 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना 12 वी नंतरचे वैद्यकीय प्रथम वर्षासाठी एम. बी. बी. एस, बी. ए. एम. एस, बी. एच. एम. एस, बी. डी. एस, बी. यु. एम. एस, बी. आर्किटेक, बी. पी. टी. एच, बी. फार्म, बी. व्ही. एस. सी आणि अभियांत्रिकी पदवी यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रथम वर्षासाठी एकदाच जास्तीत जास्त 1 लाख रुपये अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तींना पालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत आयटीआयमार्फत एम. के. सी. एल अंतर्गत येणारे एम.एस. सी. आय. टी, डी. टी. पी, टॅली व के.एल. आय. सी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महापालिका हद्दीत काम करणाऱ्या मतीमंद, अंध, कुष्ठरोगी, मुकबधीर, वृद्धाश्रम, अनाथालय अशा संस्थांना 2 लाख 99 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी बॅंकेकडील मंजूर कर्जाच्या 50 टक्के अथवा जास्तीत जास्त 1 लाख अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

गतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या नोंदणीकृत संस्थेस अथवा गतिमंद व्यक्तींच्या पालकांस दरमहा 3 हजार, पालिका हद्दीतील कुष्ठपिडीत व्यक्तींना दरमहा 3 हजार, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार, लाभार्थींच्या गरजांनुसार, अत्याधुनिक उपकरणे घेणेबाबत 1 लाख रुपये मर्यादेपर्यंत एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कल्याणकारी योजनांचा शहरातील लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले ( PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.