Pune railway : पुणे रेल्वे विभागात राष्ट्रीय एकात्मता दिन व दक्षता सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पुणे रेल्वे विभागातील विविध स्थानके, डेपो, कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.(Pune railway) विभागीय कार्यालयात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

ज्यामध्ये राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वत:ला झोकून देणे, हा संदेश आपल्या देशवासियांमध्ये पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी आणि देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याचा संकल्प करण्याची शपथ देण्यात आली. यासोबतच विभागामध्ये 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर या कालावधीत “भ्रष्टाचारमुक्त भारत-विकसित भारत” या संकल्पनेवर दक्षता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

Dighi theft : उघड्या दरवाजा वाटे 7 लाखांची चोरी

याच्या शुभारंभप्रसंगी विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सचोटीची शपथ दिली. ज्यामध्ये नैतिक कार्य पद्धती, प्रामाणिकपणा व सचोटी, पारदर्शकता, जबाबदारी, निष्पक्षता या संस्कृतीला चालना देण्यावर आधारित सुशासनाची शपथ देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय कार्मिक अधिकारी जितेंद्र प्रताप सिंग यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.