Dighi theft : उघड्या दरवाजा वाटे 7 लाखांची चोरी

एमपीसी न्यूज  – घराच्या उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्याने घरातून सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.(Dighi theft) ही घटना बुधवारी (दि. 26) दुपारी दिघी गावठाण येथे उघडकीस आली.

सचिन नंदकुमार येळवंडे (वय 37, रा. दिघी गावठाण) यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Pothole : रस्त्यांवरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा, पुणे पोलिसांचे महापालिका आयुक्तांना पत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी दुपारी चार वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.(Dighi theft) घरातून दहा तोळ्याचे मंगळसूत्र, अडीच तोळ्याची माळ, पाच तोळ्याची मोहनमाळ, पाच तोळ्याची पोत, पाच तोळ्याची साखळी असे एकूण 27.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सात लाख 37 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.