Dakshata : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

एमपीसी न्यूज – भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यात (Dakshata) दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीष सोनवणे आदी उपस्थित होते.

या वर्षी दक्षता जनजागृती सप्ताह ‘भ्रष्टाचार मुक्त भारत – विकसित भारत’ या संकल्पनेसह साजरा करण्यात येत आहे. कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे.

Pune Pothole : रस्त्यांवरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा, पुणे पोलिसांचे महापालिका आयुक्तांना पत्र

भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग (Dakshata) महत्त्वाचा असल्याने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास  नागरिकांनी टोल फ्री क्रमांक व 1064, पुणे कार्यालय दू.क्र.- 020-26132802, 26122134 संकेतस्थळ – www.acbmaharashtra.gov.in, ईमेल [email protected], मोबाईल ॲप www.acbmaharashtra.net.in किंवा 7875333333 या क्रमांकावर व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश करुन तक्रार नोंदवावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.