Pune Pothole : रस्त्यांवरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा, पुणे पोलिसांचे महापालिका आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज : पुण्यात ट्रॅफिकची समस्या गंभीर आहे. त्यात अनेक भागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे पुण्यात दररोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक नागरिक जखमी होतात किंवा मरण पावतात. (Pune Pothole) या खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आता पुणे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला पुण्यातील खराब रस्त्यांची सविस्तर यादीच पाठवली आहे. तसेच हे खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्ते दुरुस्त करण्यात यावेत असं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला केलं आहे. 

पुणे वाहतूक पोलिसांनी थेट पुणे महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहीलं आहे. यात ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते तात्काळ दुरुस्त करा अशी मागणी करण्यात आली आहे.(Pune Potholes) पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून पोलिस आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिकेला हे पत्र लिहीलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे अपघात होत आहेत तसेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे.

Pune News: ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी, नवनिर्मितीला वाव देते – सत्यशील देशपांडे

यावर तोडगा काढण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून पुण्यातील 24 प्रमुख भागात खड्डे असल्याचे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे. आता या पत्रानंतर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

पुण्यातील कुठल्या भागात किती खड्डे (पोलिसांनी दिलेल्या यादीनुसार)

विभाग आणि खड्डे असणारे एकूण ठिकाणे

कात्रज विभाग (आठ ठिकाणं)

सहकारनगर ( तीन ठिकाणं)

स्वारगेट (तीन ठिकाणं)

सिंहगड रोड (दोन ठिकाणं)

वारजे (तीन ठिकाणं)

कोथरूड (तीन ठिकाणं)

डेक्कन (तीन ठिकाणं)

चतुश्रृंगी (तीन ठिकाणं)

शिवाजीनगर (दोन ठिकाणं)

खडकी (तीन ठिकाणं)

येरवडा (सहा ठिकाण)

विमानतळ (आठ ठिकाणं)

कोरेगाव पार्क (चार ठिकाणं)

लोणीकंद (दोन ठिकाणं)

समर्थ (पाच ठिकाण)

बंडगार्डन (12 ठिकाणं)

लष्कर (1)

वानवडी (सहा ठिकाणं)

कोंढवा ( तेरा ठिकाणं)

हडपसर ( 11 ठिकाण)

मुंढवा (सात ठिकाण)

लोणी काळभोर (दोन ठिकाण )

सिंहगड रोड (चार ठिकाणं)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.