Pune rape : पुणे जिल्ह्यात मतिमंद अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. तेरा वर्षाच्या एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune rape) आरोपी मध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. शुभांगी अमोल कुचेकर (वय 25), अनिल नलवडे आणि नाना बगाडे अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील एका गावात असणाऱ्या या मतिमंद मुलीला आरोपी शुभांगी कुचेकर हिने नोव्हेंबर 2021 मध्ये फिरायला नेले. त्यानंतर तिच्यासोबत गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या फडात या मतिमंद मुलीला पाठवले. त्यानंतर एप्रिल 2022 पर्यंत या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला.

Runathon of Hope : ‘रनथॉन ऑफ होप’ 25 सप्टेंबर 2022 रोजी रंगणार

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.(Pune rape) त्यानंतर मुलीच्या आईने वालचंद नगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.