Pune : सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना चौथा राम नगरकर कलागौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या ( Pune) संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार 2024 प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना प्रदान करण्यात आला. यानंतर राजेश दामले यांनी सुभेदार यांची प्रकट मुलाखत घेतली गेली.

ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सचिन मोटे आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये 11 हजार, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. राम नगरकर यांचे सुपुत्र उदय नगरकर, स्नुषा डॉ. वैजयंती नगरकर, बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

Pune : महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त पुण्यात होणार 20 हजार किलोची मिसळ

यावेळी बोलताना विशाखा सुभेदार म्हणाल्या, “मी अंबरनाथ ते दादर असा रोजचा ( Pune) प्रवास ट्रेनने करायचे. निरिक्षणातून कलाकार घडतो, असे म्हणतात ट्रेनच्या प्रवासात मी काहीना काही शिकत गेले. या प्रवासाने मला अनेक भावनिक प्रसंग अनुभविता आले.”

सातत्याने चांगला विनोद करत राहणे ही अवघड गोष्ट आहे असे सांगत सुभेदार पुढे म्हणाल्या, “आम्ही विनोद शिकलो, विनोद करतो, विनोद जगतो यामागे आमच्या गुरुजनांचे काम मोठे आहे. विनोद हा अवखळ, बालिश, खट्याळ, विसरभोळा, अपमान करणारा, आंबट -गोड असतो पण तो परंपरेने तुमच्या पर्यंत येत असतो हे ही लक्षात घ्यायला हवे. आपला विनोद आपल्या विनोदी संस्कृतीमध्ये पेरला गेला आहे.” विनोद करताना किंवा कोणताही अभिनय करताना तुमची देहबोली महत्त्वाची असून तुमच्या कामात लेखक आणि दिग्दर्शक या दोहोंचाही मोठा वाटा आहे. नाटक, मालिका, चित्रपट तिन्ही प्रकारांमध्ये आव्हाने वेगवेगळी आहेत. त्यामुळे या प्रकारांमध्ये काम करीत असताना कलाकाराला तांत्रिक ज्ञान असणे देखील गरजेचे झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राम नगरकर यांच्या कन्या मंदा हेगडे यांनी राम नगरकर यांचा लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या ‘रामनगरी’चा काही भाग सादर केला.प्रतिभा देशपांडे यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. डॉ वैजयंती वंदन नगरकर यांनी प्रास्ताविक केले. संध्या नगरकर यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन  ( Pune) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.