Pune : महसूल आयुक्त अनिल रामोड यांना अटक; 8 लाखानंतर घरात सापडली एवढी रक्कम!

एमपीसी न्यूज : पुण्याच्या महसूल (Pune) विभागातील अतिरिक्त महसूल आयुक्त लाच स्वीकारताना रंगेहात सापडले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने आज ही कारवाई केली. डॉ अनिल गणपतराव रामोड असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयने आज सायंकाळी रामोड यांना अटक केली आहे. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, डॉ रामोड यांनी आठ लाख रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी सीबीआयकडे आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज दुपारच्या सुमारास रामोड यांच्या कार्यालयातच सीबीआयने सापळा रचला होता. त्यानंतर आठ लाख रुपयांची तक्रारदाराकडून लाख स्वीकारताना रामोड यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर रामोड यांच्या औंध बाणेर परिसरातील फ्लॅटवर देखील सीबीआयने छापेमारी केली.

पुण्यातील तीन ठिकाणी आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली असून त्यामध्ये रु. 6 कोटी (अंदाजे); स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या 14 स्थावर मालमत्तांसह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे; गुंतवणूक आणि बँक खाते तपशील आणि इतर दोषी दस्तऐवजही जप्त केले आहेत.

अटक आरोपींना उद्या शिवाजीनगर, पुणे (महाराष्ट्र) येथील सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्याला (Pune) अशाप्रकारे सीबीआयने अटक केल्यानंतर राज्यात प्रचंड खलबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत रामोड यांच्या घराची झाडाझडती सुरू होती. सीबीआयच्या या झाडाझडतीत आणखी काही रोख रक्कम सापडण्याची ही चर्चा आहे.

Pune : महसूल आयुक्त अनिल रामोड यांना अटक; 8 लाखानंतर घरावर सीबीआयचा छापा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.