Chinchwad : पालखी सोहळ्यासाठी वाहतूक पोलिसांचे चोख नियोजन

65 चौकांत बॅरिकेडींग, 47 ठिकाणी डायव्हर्शन

एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Chinchwad) चोख नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहर, देहू आणि आळंदी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच पालखी मार्गांवरील 65 मुख्य चौकांत बॅरिकेड्स लावण्यात आले असून 47 ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक नियमनासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालखी मार्गावर अवजड वाहनांना तसेच इतर वाहनांनाही प्रवेश बंदी आहे. पालखी सोबत दिंड्यांची वाहने मोठ्या संख्येने असतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी वाहतुकीत बदल केला आहे.

वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे म्हणाले, “पालखीसोबतची वाहने तसेच दिंड्यांच्या वाहनांखेरीज पालखी मार्गावर अवजड तसेच इतर वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास दंड आकारून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.”

Pune : वीजवाहिनीचा लोड वाढल्याने वाकड, बाणेर, सांगवी परिसरात दिड तास बत्ती गुल

पालखी सोहळ्यात वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त – Chinchwad

पोलीस उपायुक्त – 1
सहायक पोलीस आयुक्त – 2
पोलीस निरीक्षक – 10
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 22
पोलीस कर्मचारी – 400
वॉर्डन – 156

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.