Pune : रोटरी क्लबतर्फे 23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान पुण्यात ‘जलोत्सव 2019’

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब पुणे ,डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे ‘जलोत्सव 2019’ चे आयोजन दिनांक 23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. पाण्याविषयी, पाणी वापर, बचत, पुनर्वापर याविषयी जागरूकता, जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी हा जलोत्सव आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जल क्षेत्रात असलेल्या कारकिर्दीच्या संधींवर मार्गदर्शन करण्यावर यावर्षी भर देण्यात येत आहे.

रोटरी क्लब पुणे,डिस्ट्रीक्ट 3131 च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या उपक्रमाचा प्रारंभ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च – (आयसर,पाषाण ) येथे होत आहे . 23 फेब्रुवारी रोजी आयसर (पाषाण )संस्थेत प्रदीप लोखंडे ,डॉ. अरविंद नातू, अशोक रुपनर यांच्या उपस्थितीत जलोत्सव 2019 च्या उपक्रमांचा अनौपचारिक प्रारंभ होत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या’रोटरी वॉटर ऑलिम्पियाड’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे . हा कार्यक्रम सकाळी 10 ते 4 वेळेत होणार आहे . रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांनी संयोजन केले आहे .

या जलोत्सवादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ अरविंद नातू, उमेश मुंडले, व्ही एम देसाई, ओ. मणीवान्ना, प्रदीप पुरंदरे, उपेंद्र धोंडे, कृष्णा लव्हेकर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ श्रीकांत गबाले, रवींद्र उलंघिवार, संजय इनामदा , प्रभात रंजन यांची व्याख्याने होणार आहेत. रोटरी वॉटर ऑलिम्पियाड स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या जलोत्सवात 2 मार्च रोजी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.