Pune School bus accident : पुणे जिल्ह्यात 44 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस दरीत कोसळली

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका खाजगी शाळेची बस खोल दरीत कोसळली. यावेळी बस मधून प्रवास करणारे 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. (Pune School bus accident) जखमी झालेल्यांमध्ये काही शिक्षकांचा देखील समावेश आहे.. अपघातग्रस्त बस मधून सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील मुक्ताई प्रशाला या शाळेची ही बस होती.. शाळेची विद्यार्थी आणि शिक्षक गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. असताना शाळेची बस खोल दरीत कोसळली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यास सुरुवात केली.

Chandrakant Patil : विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे –  चंद्रकांत पाटील

बस मध्ये इयत्ता दहावीचे 19 विद्यार्थी, इयत्ता नववीचे 11 विद्यार्थी इयत्ता आठवीचे 13 विद्यार्थी व इयत्ता सातवीचा  एक विद्यार्थी असे एकूण 44 विद्यार्थी प्रवास करत होते.(Pune School bus accident) त्यांच्यासोबत एक प्राचार्य, दोन शिक्षक, एक ड्रायव्हर व एक शिपाई सुद्धा प्रवास करत होते. असे एकूण 49 जण त्या बस मध्ये प्रवास करीत होते. बस मध्ये अडकलेल्या सर्व जखमींना तातडीने बाहेर काढून सर्वांना रुग्णवाहिकेद्वारे घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी चार मुलांना मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पाच जणांवर साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे उपचार चालू आहेत. दोन जणांवर मंचर सिटी हॉस्पिटल मंचर येथे चालू आहेत. नऊ जणांवर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचार चालू आहेत. आठ जणांवर ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे उपचार चालू आहेत. एकावर सार्थक हॉस्पिटल मंचर येथे चालू आहे. (Pune School bus accident) दोन जणांवर डॉक्टर डोंगरे हॉस्पिटल घोडेगाव येथे उपचार चालू आहेत. दोन जणांवर सिद्धी हॉस्पिटल मंचर येथे उपचार चालू आहेत. असे एकूण 29 जणांवर उपचार चालू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.