Civet cat rescue : हिंजवडी फेज 3 मधील कंपनीतून एका उदमांजराला केले रेस्कयू 

एमपीसी न्यूज : हिंचवडी फेज 3 येथील Quadran Embassy या कपंनीतून एका उदमांजराला काल रात्री रेस्कयू करण्यात आले होते.(Civet cat rescue) वनविभागाने या उदमांजराला सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिले आहे.

कपंनीतून काल रात्री 8.30 वा. च्या दरम्यान अजित भालेराव यांना फोन आला. फोनवर कुठला तरी वेगळाच प्राणी कंपनीतील कॅन्टीन मध्ये आला आहे असे त्यांना कळाले. त्यांनी जुजबी माहीती घेतल्यानंतर सदर प्राणी उदमांजर (Civet Cat) असल्याचे निष्पन्न झाले.(Civet cat rescue) लगेचच याची माहिती तुषार पवार यांना दिली. पवार यांनी याची माहिती शेखर महाराज जांभूळकर तसेच गणेश भुतकर यांना दिली. त्यानंतर तातडीने अजित भालेराव, तुषार जोगदंड, श्रीनिवास देवकाते अशी सर्व टीम तेथे पोहचली.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयातील एनएसएस कार्यक्रमात पोपट सांबरे यांचे मार्गदर्शन

थोडेसे प्रयत्न केल्यानंतर शेखर महाराज जांभूळकर, तसेच तुषार पवार यांनी सुरक्षित रित्या उद मांजराला पकडले. तसेच वनविभागाला कळवून लगेचच त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.(Civet cat rescue) उदमांजर हा प्राणी मिश्र आहारी आहे. हा प्राणी उंदीर, घुस, सरडे, पाली तसेच फळे खाऊन आपली उपजीविका करतो. हिंजवडी परीसरात प्रथमच असा रेस्क्यू झाल्याने हा सगळीकडे कुतूहलाचा विषय झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.