BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लाल महालाजवळ लोटला शिवभक्तांचा महासागर

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

एमपीसी न्यूज – कोल्हापूरच्या भवानी मंडप प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत रथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ७५ स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… ५१ रणशिगांची ललकारी… शिवगर्जना ढोलताशा पथकाचा रणगजर… पुणेकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवजयंतीनिमित्त शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या मिरवणुकीचे. सोहळ्याच्या सुरुवातीला लालमहाल चौकात अमर जवान स्तंभ उभा करुन पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3