Pune Suicide Case: एका उच्चशिक्षित युवकाने नोकरी नं मिळण्याच्या भितीने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज: एका उच्चशिक्षित युवकाने प्लेसमेंटमधून नोकरी मिळणार नाही या भीतीने 8व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. (Pune Suicide Case) या युवकाचे नाव अक्षय माटेगावकर असून तो अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा चुलत भाऊ आहे.
पोलिसांनी माहिती दिल्यानुसार अक्षय माटेगावकर, वय 21 वर्षे, रा. माऊंट युनिक सोसायटी, सुसगाव याने राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली आहे. lत्याचे घर 8व्या मजल्यावर आहे. (Pune Suicide Case ) घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्याने त्याला प्लेसमेंट मिळणार नाही या भीतीने आत्महत्या केली आहे असे म्हंटले आहे. त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी औंध हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे.
त्याची आई मीनल माटेगावकर ह्या मुकेश पाटील स्कूल ऑफ टेकनॉलॉजी मॅनॅजमेण्ट अँड इंजिनिअरिंग मधील सिव्हील विभागाच्या प्रमुख आहेत. वडील अमोल माटेगावकर हे प्रिन्सटन ब्ल्यू चे प्रमुख आहेत. बहीण आकांक्षा ही शिक्षण घेत आहे. त्याचे काका पराग माटेगावकर यांनी सांगितले की, अक्षयला कोणतेही टेन्शन नव्हते. तो उत्तम गाणारा होता. पूर्ण परिवार उच्चशिक्षित असल्याने त्याने आत्महत्या कशी केली, हा प्रश्नच आहे.
सुसाईड नोट
आत्महत्या  करण्यापूर्वी अक्षयने इंग्रजी मध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये असे लिहिले आहे की…
हे माझे शेवटचे लिहलेले असेल. मला माफ करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मी खूप प्रयत्न केले पण नाही करू शकलो.
मी इंटर्नशिपमध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पण नाही करू शकलो. यामुळे मला प्लेसमेंट मिळणार नाही. मला या क्षेत्रात पुढे जायचे नाही व ते तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही.
आई, बाबा आणि आकांक्षा मला माफ करा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.