Pune : सुषमा अंधारे यांनी मागितली वारकऱ्यांची माफी

एमपीसी न्यूज : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा संताच्या (Pune) विचारांवर केलेल्या वादग्रस्त विधानांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या वक्तव्यांविरोधात वारकरी संप्रदायाने आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला. त्यांच्या या विधानाने वारकरी संप्रदायातील लोकांची मने दुखावली गेली. याप्रकरणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना, वारकऱ्यांची हात जोडून माफी मागितली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, कि माझ्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची हात जोडून माफी मागते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेव्हा जेव्हा मी धारेवर धरत प्रश्न विचारते तेव्हा अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल केले जातात. मी कुणाच्याही श्रद्धेच्या आड आले नाही. मी कबीर पंथी आहे. मी कर्मकांड मानत नाही. मी फक्त चैतन्य मानते. तहीरी मला विरोध होतोय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला सुडबुद्धीने विरोध होतोय. विरोध करणाऱ्यांमागे भाजपचा हात आहे. विरोध करणारा वारकऱ्यांचा गट (Pune) भाजपचा आहे, असं त्या म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.