Pimpri News : नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज : कायदा आणि सुव्यवस्था राखण्या बरोबरच सायबर गुन्हे व आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी (Pimpri News) काम करणार असल्याचे नव नियुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंगळवारी राज्य गृह विभागाने चौबे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदावर बदली केली होती. आज त्यांनी चिंचवड येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बरोबर एका तासाच्यावर चर्चा करून येथील परिस्थितीची माहिती घेतली.

पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या कार्याला प्राधान्य देणार असे विचारले असता, चौबे म्हणाले की, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच सायबर गुन्ह्यांवर देखील लक्ष देणार. तसेच, इकॉनॉमिक ऑफ्फेन्सेस (आर्थिक गुन्हे) वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही लक्ष ठेवणार.

PCMC : …तर स्वच्छ सर्वेक्षणात शहराला नक्की यश मिळेल; आयुक्तांचा विश्वास

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे अजूनही नाही. याबाबत विचारले असता, चौबे म्हणाले की, “फक्त पोलीस ठाणे असून चालत नाही, तर ट्रेंड मॅनपॉवरही (प्रशिक्षित मनुष्यबळ) केस सोडवण्यासाठी गरजेचे आहे. मुंबईमध्ये 5 क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी एक सायबर पोलीस ठाणे आहे. तसेच, केंद्रीय स्तरावर डीसीपी (उप आयुक्त) लेव्हलवरही आहेत. छोट्या केस पोलीस ठाण्याच्या लेव्हलवर सॉल्व होतात. सायबर पोलीस ठाणे हे पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय स्तरावर असणे योग्य राहील, की स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर योग्य राहील. या विषयी आम्ही चेक करू. ”

पुढच्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. याविषयी विचारले असता चौबे म्हणाले की, “निवडणुकांच्या पूर्वी लागणारी सर्व योग्य कारवाई आम्ही करू. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काम करू”, असे मत विनयकुमार यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.