Pune : तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रसंगी गैरहजर असलेल्या तीन पोलिसांचे निलंबन

एमपीसी न्यूज : सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी सकाळी 10 वाजण्याच्या (Pune) सुमारास आरोपी शंतनू जाधव याने एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुणी जखमी झाली असून हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट चौकीत पोलिस हजर नव्हते.

त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी तीन पोलिस हवालदारांना पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

घटनेनंतर (Pune) तब्बल 20 मिनिटांनी पोलीस कर्मचारी पोलिस चौकीत आणि घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती सोशल मीडियावर समोर येताच, पुणेकर नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर याच पोलिस चौकीचा आधार जखमी तरुणीला घ्यावा लागला होता.

Maval : मावळात देशी बनावटीच्या पिस्टलसह तरुणाला अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.