Maval : मावळात देशी बनावटीच्या पिस्टलसह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपुर्वीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Maval) चार पिस्टल 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक करत एक मोठा कट उधळून लावला. त्याच्या दोन दिवस आधी गुन्हे शाखा पाचच्या पथकाने ही मावळातूनच आणखी एकाला देशी बनावटीचे पिस्टल एक जिवंत काडतुस यासह अटक केली आहे. हि कारवाई सुदवाडी फाटा जांबवडे येथे 24 जून रोजी दुपारी करण्यात आली .

मयुर अशोक पवार (वय 29 रा.वराळे, मावळ) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बुधवारी (दि.28) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : कंपनीच्या स्टोअर रुममधून 2 लाख रुपयांचे तांब्याचे बॉबीनरील चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांनी अटक केली असता (Maval) त्याच्याकडून 25 हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल व 500 रुपयांचे एक जिवंत काडतुस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलीस याचा पुढील तपास करत आहेत. मात्र बेकायदेशीररित्या वाढत जाणाऱ्या या शस्त्रांची संख्या पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.