Khed : कंपनीच्या स्टोअर रुममधून 2 लाख रुपयांचे तांब्याचे बॉबीनरील चोरीला

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील वराळे (Khed) येथील हिमतेज इंडिया प्रा.ली. या कंपनीमधून 2 लाख रुपयांचे तांब्याचे बॉबीनरील चोरीला गेले आहेत. हि चोरी 23 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी बुधवारी (दि.28) जयकुमार बलवंत अगरवाल (वय 35, रा.वाकड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या कंपनीमधील स्टोअर (Khed) रुममध्ये रात्री प्रवेश करत चोराने 3 टन वजनाचे 2 लाख रुपयांचे तांब्याचे बॉबीनरिल व बंद बॉक्स व खुले बॉबीन असा एवज चोरून नेला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Chikhali : गुंडाकडून चिखलीत भरदिवसा वाहनांची तोडफोड व हातात कोयते फिरवत दहशत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.