Chikhali : गुंडाकडून चिखलीत भरदिवसा वाहनांची तोडफोड व हातात कोयते फिरवत दहशत

एमपीसी न्यूज – सनी भाईला मारले म्हणत (Chikhali) दोघांनी आरडोओरडा करत वाहनांची तोडफोड केली व हातातील कोयते फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. हा सारा प्रकार चिखलीतील सार्वजनिक रोडवर बुधवारी (दि.28) दुपारी पावणे चार या 15 मिनिटांच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी गंगाधर भिमराव चव्हाण (वय 32, रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीवरून आलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे दुचाकीवरून आले व त्यांनी कोयत्यासारख्या हत्याराने वाहनांच्या काचा फोडल्या. व हातातील कोयता फिरवत सनी भाईला मारले असे जोर-जोरात ओरडत परिसरात दहशत पसरवली.

हा सारा प्रकार भरदिवसा घडत होता. त्यामुळे नागरिकांमध्येही (Chikhali) भितीचे वातावरण आहे. मात्र, दिवसा सार्वजनिक रोडवर असे प्रकार घडत असूनही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Pune : केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल स्कूलमधील चिमुकले रंगले आषाढी वारीचा सोहळ्यात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.