BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सिंहगडावर छत्रपती शिवरायांनी बांधलेली तानाजी मालुसरे यांची समाधी सापडली

INA_BLW_TITLE

एमपीसे न्यूज- किल्ले सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करत असताना छत्रपती शिवरायांनी बांधलेली नरवीर तानाजी मालुसरे यांची देह समाधी सापडली आहे.

तानाजी मालुसरे यांनी 1670 साली लढाई करून सिंहगड किल्ला स्वराज्यात आणला. या लढाईदरम्यान ते सिंहगडावर धारातीर्थी पडले. ज्या ठिकाणी देह सोडला म्हणून त्या जागेला धारातीर्थ किंवा देहसमाधी म्हणतात. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनीच ही समाधी बांधली आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच एक शिवकालीन ऐतिहासिक ठेवा राज्याला मिळाला आहे.

याबाबत बोलताना तानाजी मालुसरे यांच्या वंशज असलेल्या शीतल मालुसरे म्हणाल्या, ” नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्फूर्तीस्थळ त्यांच्या ३४९ व्या पुण्यतिथीपूर्वी प्रकाशझोतातआले हा अभूतपूर्व योगायोग म्हणावा लागेल. हे स्फूर्तीस्थळ मालुसरे यांच्यासह अनेक मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे”

ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे म्हणाले की, 349 वर्षानंतर प्रथमच शिवाजी महाराजांनी उभारलेली नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.