Pimpri: स्मार्ट सिटीच्या रँकमध्ये पिंपरी सव्वीसव्या स्थानी  

एमपीसी न्यूज – देशभरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या 100 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा सव्वीसवा रँक आला आहे. तर, पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर असून सिल्वासा शहर शेवटच्या क्रमांकावर आहे. पुणे शहर आठव्या क्रमांकावर आहे. 

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पुण्यासह पिंपरी – चिंचवड शहराचाही समावेश आहे. स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाला आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी महापालिकेकडून 13 जुलै 2017  रोजी पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

स्मार्ट सिटीअंतर्गत झालेल्या कामावर रँक काढला जातो. निविदा काढल्या. किती कामाला सुरुवात केली. या निकषानुसार रँक काढला जातो. या रँकमध्ये पिंपरी-चिंचवड शहर पहिल्यांदा 78 व्या क्रमाकांवर होते. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा होऊन 52 व्या क्रमांकावर आले. आता त्यामध्ये आणखीन सुधारणा झाली असून शहराचा 26 वा क्रमांक आहे. पाच दिवसांनी हा रँक बदलतो.

”पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीने ‘पॅन सिटी’चा प्रकल्प हाती आहे. हे काम ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीला देण्यात आले आहे. त्याची वर्क ऑर्डर (कार्यरंभ) आदेश देखील देण्यात आला आहे. कंट्रोल अॅन्ड कमांड या कामाची देखील निविदा उघडली आहे. निगडीतील अस्तित्व मॉल येथे कंट्रोल अॅन्ड कमांड सेट्रल असणार आहे. पोलीस देखील तिथे असणार आहेत”, असे  स्मार्ट सिटीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.