Pune Tempreture : पुणे 41.8 तर चिंचवड 43.6 अंश; नागरीेक उकाड्याने हैराण

एमपीसी न्यूज – संपुर्ण देशासह राज्यात सुर्य सध्या आग ओतत असून राज्यातील तापमानाने 40 च्या पुढे पारा ओलांडला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पारा 41 अंशाच्या पुढे आहे. पुणे शहरात गुरुवारी 41.8 अंश तर चिंचवड शहरात 43.6 तापमानाची नोंद झाली. पुणे शहरात गुरुवारी सर्वात जास्त तापमान कोरेगाव पार्क येथे 44.2 अंश नोंदले गेले.गेल्या दहा वर्षांमधील हे सर्वात जास्त तापमान आहे.

 

शहरात उन्हाचा चटका वाढल्याने थंड पेय्यांच्या दुकानांमध्ये नागरीकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळत होते.अनेक जण उसाचा रस,ताक,लस्सी, बर्फाचे गोळे घेताना दिसत होते. उन्हापासून वाचण्यासाठी नागरीक टोपी,हातमोजे आणि रुमालाचा वापर करताना बघायला मिळाले.

 

सकाळी आठ,नऊ वाजल्यापासूनच ऊन तापायला लागले होते.या उकाड्यापासून स्वत:ची सुटका करण्यासाठी आता जलतरण तलावावर नागरीकांची गर्दी होऊ लागली आहे.ज्यांना कामानिमित्त बाहेर पडावे लागत आहे ते सनकोट,टोपी, रुमाल यांचा वापर करुन स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाहतूक सिग्नलला थांबायला लागल्यास अनेक वाहन चालक आपल्या गाड्या सावलीत उभ्या करीत आहेत.जेणे करून उन्हापासून आपला बचाव होईल.

पुणे आणि  चिंचवड शहरातील विविध भागांचे तापमान पुढीलप्रमाणे

पुणे शहर 41.8

पाषाण 41.7

चिंचवड 43.6

लवळे 42.7

मगरपट्टा 42.6

तऴेगाव 42.6

कोरेगाव पार्क 44.2

एनडीए 42.1

वडगावशेरी 41.7

आंबेगाव 41.5

पुरंदर 41.4

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.