Pune : देशाच्या विकासासाठी समाजाच्या आकांक्षावादाला प्रोत्साहन देण्याची गरज : डॉ. विनय सहस्रबुद्धे

एमपीसी न्यूज – अमृतकाळात देशाच्या प्रगतीने पकडलेली (Pune)लय टिकविण्यासाठी आणि एकात्म समाज म्हणून देशाचा विकास करण्यासाठी भारतीय समाजाच्या आकांक्षावादाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (Pune)(आयसीएसएसआर) वतीने ‘अमृतकाळाच्या उंबरठ्यावर आकांक्षावान भारत’ या विषयावर डॉ. सहस्रबुद्धे यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्यान आयोजित केले होते.

Pimpri : रविवारी पिंपरीत सामाजिक सलोखा आरक्षण परिषद

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्राध्यापक धनंजय कुलकर्णी, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आठवले, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, आयसीएसएसआर च्या विभागीय संचालिका डॉक्टर स्मिता शुक्ला व्यासपीठावर उपस्थित होत्या.

सहस्रबुद्धे म्हणाले, गेल्या 75 वर्षातील विकासातील अनुशेष पूर्ण करण्याचे काम दहा वर्षात होत आहे. आपण आपल्या मूळ अस्मितेकडे वळत आहोत. स्वदेश, स्वभाषेबद्दल प्रकर्षाने जाणीव, ब्रिटिशधार्जिनी पराभूत मासिकता दूर करणे, लोकशाही बळकट करणे, राजकीय व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करणे, संकल्पनाबद्दल बदल, तरुणांमध्ये उद्योजकता वाढ या गोष्टी घडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकास ही लोक चळवळ होत असून आपला प्रवास आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू आहे.

डॉ. कुंटे म्हणाले, तंत्रज्ञान, विविध वस्तू व सेवांची निर्मिती, वितरण व्यवस्था या द्वारे समाजातील शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाचा जेव्हा विकास होईल तेव्हा राष्ट्र विकसित झाले असे म्हणता येईल.
डॉ. अमृता कुलकर्णी, आरती खातू, यांनी सूत्रसंचालन डॉ. राधिका जाधव यांनी परिचय आणि प्राचार्य डॉ नितीन कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.