Chakan : चाकण पालिकेच्या हद्दवाढीस ग्रामपंचायतींचा विरोध; 16 गावाचे कारभारी एकवटले, आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज : चाकण नगरपरिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्याबाबतचा (Chakan) सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्याच्या नगरविकास विभागाला नुकताच पाठवला आहे. या प्रस्तावित करण्यात आलेल्या हद्द वाढीला लगतच्या ग्रामपंचायतींचा प्रखर विरोध पहावयास मिळत आहे. प्रस्तावित हद्द्वादीतील सोळा गावच्या सरपंच,उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचा चाकणनगर परिषदेत समाविष्ट होण्यास विरोध करण्यासाठी बुधवारी ( दि. 20 डिसेंबर ) निघोजे ( ता. खेड ) येथे बैठक झाली. यावेळी हद्दवाढ विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

चाकण लगतचे ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत . नगरपरिषदेच्या हद्दवाढीमध्ये कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे या गावांचा समावेश करून भविष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेची हद्दवाढ करून येथील यंत्रणा कार्यक्षम करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु ग्रामपंचायतीनी हद्दवाढीस विरोध तीव्र केला आहे.

Pune : देशाच्या विकासासाठी समाजाच्या आकांक्षावादाला प्रोत्साहन देण्याची गरज : डॉ. विनय सहस्रबुद्धे

निघोजे ( ता. खेड ) येथील बैठकीतून ग्रामपंचायती अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहेत. पुढील दोन दिवसात यातील विविध ग्रामपंचायती ग्रामसभेचा ठराव करून राज्याचे मुख्यमंत्री,नगर विकास मंत्री यांना निवेदने व ठराव घेऊन भेटणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले. जबरदस्तीने व स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता या बाबत निर्णय घेतल्यास आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा (Chakan) इशारा यावेळी देण्यात आला.

तीव्र आंदोलन करणार : पाटीलबुवा गवारी ( मा.सरपंच मोई )

चाकण नगर परिषद हद्दवाढीच्या प्रस्तावाला चाकण लगतच्या सोळा गावच्या सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधींचा व ग्रामस्थांचा विरोध आहे, यापूर्वी देखील हा विरोध आम्ही नोंदवला आहे. शासनाने बळजबरीने आम्हाला चाकण नगरपरिषदे मध्ये समाविष्ट केल्यास आंदोलन करू असा इशारा मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी यांनी यावेळी दिला.

आमच्या ग्रामपंचायती सक्षम : सुनिता येळवंडे ( सरपंच निघोजे )

चाकण लगतच्या 16 ग्रामपंचायती सक्षम आहेत. एमआयडीसी लागत असलेलीनिघोजे ग्रामपंचायत व आम्ही आमच्या गावचा विकास करण्यासाठी सक्षम आहोत.चाकण नगर परिषद मध्ये समावेश होण्यास संपूर्ण गावाचा विरोध आहे. चाकण परिषद हद्दीतील रस्ते,सांडपाणी व्यवस्था,कचरा व्यवस्था,पाणी पुरवठा व्यवस्था यांची बोंबाबोंब आहे. त्यामुळे आमच्यावर हा निर्णय लादू नये असे यावेळी निघोजे गावाच्या सरपंच सुनिता येळवंडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.