Pune : पुण्यातील ससून रुग्णालयातील शिक्के चोरीला


एमपीसीन्यूज -पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण ताजे (Pune)असतानाच ससून मधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील शिक्के चोरीला गेले आहे.

आरोपींनी शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार(Pune) केले आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रकाश पांडुरंग मोंडकर आणि सत्पाल पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मोंडकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Thergaon : ऑनलाइन टास्क बहाण्याने तरुणाची 71 हजार रुपयांची फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी १४ डिसेंबर रोजी ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिक्के चोरी केले. त्याआधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले. ही बाब समोर आल्यानंतर डॉ. दामशेट्टी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. नेमके हे बनावट प्रमाणपत्र या आरोपींनी कोणाला वाटले आणि त्यातून किती रक्कम कमावली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.