Pune: ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी वर्षभरात ग्राहकसंख्येमध्ये तब्बल 3 लाखांनी वाढ

एमपीसी न्यूज – महावितरणचे वीजबिल ‘ऑनलाइन’द्वारे भरण्यासाठी (Pune)वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल3 लाख 5हजार 300 ने वाढली आहे.

सद्यस्थितीत लघुदाब वर्गवारीतील सरासरी 21लाख 38हजार 350(74.5 टक्के) घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा सुमारे 559 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करीत आहेत.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये (Pune)राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सरासरी 28लाख 70 हजार 998ग्राहक दरमहा वीजबिल भरतात. त्यातील 74.5 टक्के म्हणजे 21लाख 38 हजार 348 ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहेत. सन 2022 च्या तुलनेत सन 2023मध्ये ‘ऑनलाइन’साठी 3लाख5 हजारांनी ग्राहकसंख्येत भर पडली असून भरण्याची रक्कम देखील129 कोटी रुपयांनी वाढली आहे.

Khed : मशीनमध्ये अडकल्याने कामगाराचा हात तुटला, सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल

पुणे शहरात गेल्या वर्षभरात ‘ऑनलाइन’साठी पसंती दिलेल्या ग्राहकांची संख्या 1 लाख 46 हजार 300ने वाढली असून भरण्याच्या रकमेत देखील 59 कोटी31लाख रुपयांनी भर पडली आहे. सद्यस्थितीत सरासरी11 लाख 80हजार 191 (73.6टक्के) लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा 295 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात सरासरी 7 लाख 4हजार763 लघुदाब वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा करीत आहेत. त्यातील 5लाख 63 हजार 85 (80टक्के) ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे दरमहा151कोटी 76 लाख रुपयांचा भरणा करीत आहेत. सन 2023 मध्ये या ग्राहकसंख्येत 81हजार 180 ने भर पडली असून ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याची रक्कम 35 कोटी 74 हजार रुपयांनी वाढली आहे.

ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये लघुदाबाच्या सरासरी 5लाख 63हजार 344 पैकी 3लाख 95 हजार 74(70.1टक्के) वीजग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे 111 कोटी 35 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करीत आहे. सन 2023 मध्ये या ग्राहकसंख्येत 77 हजार 811 ने भर पडली असून भरण्याची रक्कम 33 कोटी 15 लाख रुपयांनी वाढली आहे.

लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/ डेबीटकार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यात एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरता येत आहे.

महावितरणच्या आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवेमध्ये ‘ऑनलाइन’ सेवा अतिशय महत्वाची आहे. त्यास पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासोबतच लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची किमान 5 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार 5 हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे.- मुख्य अभियंता राजेंद्र पवार, पुणे परिमंडल

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=yiL5tv7B0bU&t=47s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.