Maharashtra: मराठा समाजाचे 23 जानेवारीपासून सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – मराठा समाजाचे मागासलेपण(Maharashtra ) तपासण्यासाठी आता येत्या दिनांक २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात होणार असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सांगण्यात आले.

त्यामुळे या सर्वेक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यासंह (Maharashtra )महानगरपालिका, नगरपालिकांतील कर्मचाऱ्यांना शनिवारपासून दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर थेट सर्वेक्षणाला सुरूवात होणार असून हे सर्वेक्षण येत्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.

Khed : मशीनमध्ये अडकल्याने कामगाराचा हात तुटला, सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल

जिल्ह्याच्या अथवा महानगरपालिकेच्या मुख्यालयात तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय सर्व प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर वापराचे शनिवारपासून प्रशिक्षक प्रशिक्षण देतील. वॉर्ड व तालुक्याचे प्रशिक्षक 21 आणि 22 जानेवारीला संबंधित तालुक्याच्या किंवा वॉर्डाच्या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील.

तर, दिनांक 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात येणार आहे. येत्या 31 जानेवारीपूर्वी सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे, असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव आशा पाटील यांनी सांगितले. या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.