Pune : दहशतवाद्यांनी वापर केलेल्या गाडी मालकाची एटीएसकडून चौकशी

एमपीसी न्यूज – पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांनी ज्या गाडीचा वापर केला त्या चारचाकी गाडी मालकाची देखील चौकशी करण्यात येत ( Pune )  असल्याची माहिती  एटीएस कडून  देण्यात आली आहे.

ही चारचाकी गाडी मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांनी मुंबईतून पळून आल्यानंतर पुण्यात खरेदी केली होती . ज्या व्यक्तीकडून ही चार चाकी घेण्यात आली होती. त्याची एटीएसने चौकशी सुरु केली आहे.

या गाडीत एटीएसला 2 पिस्टल आणि 5  जिवंत काडतुसे सापडली होती.

Alandi : महाराज मंडळींनी व्यावसायिकीरण , सप्ताह सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करताना नावापुढे आळंदीकर लावू नये- आळंदी ग्रामस्थ

या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एन आय ए) जाण्याची शक्यता आहे. “रतलाम मोड्युल” शी निगडित असलेल्या या दोघा दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. अल सुफा या दहशतवादी संघटनेशी ( Pune ) संबंधित असलेले हे दोघेही एनआयएच्या रडारवर होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.