Pune : संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ ; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

एमपीसी न्यूज – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या समोरील अडचणीत आणखी वाढ ( Pune) झाली आहे. युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी भिडेंविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Pune : दहशतवाद्यांनी वापर केलेल्या या गाडी मालकाची एटीएसकडून चौकशी

संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर संभाजी भिडे यांचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनही झाली. भिडेंना तत्काळ अटक करण्यात यावं अशी मागणी देखील काँग्रेस कडून करण्यात येत आहे.

दरम्यान संभाजी भिडे यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असे कुमार सप्तर्षी यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार ही जनहित याचिका दाखल करण्यात आली. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता म्हणून आदरणीय आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांची विचारसरणी संपवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचा घणाघात सप्तर्षी यांनी केलाय.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दंगली पेटवण्याची तयारी असून त्यामुळेच अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली जात ( Pune) आहेत असा आरोपही सप्तर्षी यांनी केलाय.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.