Pune : महावितरणमधील उत्कृष्ट 58 कर्मचा-यांचा गौरव

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत तत्पर ग्राहक सेवा, वीजवाहिन्यांची आणि उपकेंद्रांची विनाअपघात देखभाल तसेच दुरुस्ती आदी निकषांप्रमाणे सन 2017-18 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 14 यंत्रचालक आणि 44 कर्मचा-यांना गौरविण्यात आले.

रास्तापेठ येथे महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, उपसंचालक (दक्षता) व प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) कमांडर (निवृत्त) शिवाजी इंदलकर, महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता वंदनकुमार मेंढे, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) राजेंद्र म्हकांळे, अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन उत्कृष्ट 58 कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.

  • यावेळी मुख्य अभियंता तालेवार म्हणाले, की वीजग्राहकांना तत्पर आणि सुरळीत वीजसेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक कर्मचाऱ्यांनी वीजयंत्रणेचे काम करताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक इंदलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी केले तर, सौ. अपर्णा माणकीकर यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे परिमंडलातील उत्कृष्ट कर्मचारी पुढीलप्रमाणे – मनोज सूर्यवंशी, मझर इनामदार, लाझरस रणभिसे, सुरेश भोसले (बंडगार्डन विभाग), पोपट कांबळे, अजित लोखंडे, नवनाथ मुंढे, तुकाराम कातकाडे (नगररोड विभाग), राधाकृष्ण चावरे, जमालुद्दिन सय्यद, सखाराम भोजने, गणेश मेश्राम (पद्मावती विभाग), रामदास पिटेकर, हनुमंत शिवरकर, गोरखनाथ पोकळे, अशोक मुंडे (पर्वती विभाग), सुशांत गोगावले, परसराम गायकवाड, विशाल कानपिळे, सुरेंद्र मोहिते (रास्तापेठ विभाग), अभिजित भालेराव, अरविंद वराडे (रास्तापेठ चाचणी विभाग), तानाजी रेंगडे, तुकाराम हिंगे, खंडू कारंडे, निवृत्ती पडवळ, प्रशांत निर्मल, सुभाष मोरे (मंचर विभाग), बापू दिवेकर, सचिन मेघुंडे, शुभम गित्ते, कृष्णा दानवले, पोपट केसकर (मुळशी विभाग), राजेंद्र अडसुळे, प्रसाद पोकळे, सागर शेळके, गोरक्षनाथ थिटे, सचिन कळढोणे, अजय सोनटक्के (राजगुरुनगर विभाग), रवींद्र रुपे, अंकुश चव्हाण, गणपत केवाळ, अमोल शिंगाडे (भोसरी विभाग), विकास कुलकर्णी, नागेश ढगे, प्रशांत कदम, अविनाश लिंबोळे (कोथरूड विभाग), संदीप साळुंके, राहुल पारधी, दुर्गेश पाटील, विठ्ठल इरनक (पिंपरी विभाग), श्रीकृष्ण ढेरे, तानाजी राठोड, सतीश टेकाळे, शेखर मांजरे (शिवाजीनगर विभाग), अनुराग भोईर (गणेशखिंड चाचणी विभाग), शैलेश भालेराव, गुलाब झारगड (स्थापत्य विभाग).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.