Pimpri : पाण्याचे स्त्रोत आणि विहिरी साफ करण्याची नगरसेविका मीनल यादव यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड हद्दीतील जुने पाण्याचे हापसे व विहिरी पुनर्जिवीत करुन गाळ तसेच घाण महापालिकेच्या वतीने साफ करावी, त्यातील पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात यावे. यामुळे परिसरातील पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होईल. पाण्याचे स्त्रोत आणि विहिर साफ करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका मीनल विशाल यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पवना धरणांतील कमी पाण्याच्या साठ्यामुळे शहरासाठी पाणी कपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.