Pune : सराफ बाजारातील पेढीतून चोरट्यांनी 3 कोटी 32 लाखांचा ऐवज केला लंपास

एमपीसी न्यूज – सराफ बाजारातील एका ( Pune) पेढीतून चोरट्यांनी पाच किलो सोने, तसेच 10 लाख 93 हजारांची रोकड असा 3 कोटी 32 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना रविवारी (31डिसेंबर) मध्यरात्री ते सोमवारी (दि.1) सकाळी या कालावधीत घडली असून यामुळे सराफ बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी दीपक माने (वय 39, रा. साई कॉर्नर, रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सराफ पेढीतील कारागिरांनी दागिने आणि रोकड चोरल्याचा संशय माने यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra : जानेवारी ते मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत माने यांची राज कास्टिंग पेढी आहे. या पेढीत दागिने घडवून त्याची विक्री सराफ बाजारातील पेढींना केली जाते. राज कास्टिंगजवळ कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे कार्यालय आहे. नववर्षाच्या गडबडीत माने होते. त्यांनी पेढीत पाच किलो सोने, तसेच 10 लाख 93 हजारांची रोकड ठेवली होती.

पेढीतील कारागिरांनी सोने, तसेच रोकड असा 3 कोटी 32 लाख 9 हजार 228 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.