Pune : अस्वच्छतेप्रकरणी  पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरात केला 1 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज –  सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेच्या वाढत्या ( Pune ) समस्येचा सामना करण्यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात, घनकचरा व्यवस्थापन विभागाने 1 कोटी 66 लाख 37 हजार रुपयांचा दंड वसूल करत 37 हजार 152 नागरिकांना हा दंड ठोठावण्यात आला होता.

Pune : सराफ बाजारातील एका पेढीतून चोरट्यांनी 3 कोटी 32 लाखांचा ऐवज लंपास

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नुकताच देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरचा अभ्यास दौरा केला. दौऱ्यात शिकलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून, अधिकारी पुण्यात अधिक स्वच्छ आणि अधिक शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यानुसार महापालिका थुंकणे, कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे आणि इतर अस्वच्छ प्रथा यांसारख्या कृत्यांसाठी महापालिका 180 ते 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारू ( Pune )शकते.

2023 मध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडाचातपशील खालील प्रमाणे –

* सार्वजनिक ठिकाणी थुंकणे: 1 हजार 248  लोकांकडून 12 लाख 48 हजार रुपयांची वसूली

* सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे:  858 जणांकडून 1 लाख 81 हजार 670 रुपये दंड वसूली

* अडथळा निर्माण करणारे बांधकाम: 298 जणांकडून 14 लाख 65 हजार 650 रुपये दंड वसूली

* प्लास्टिक वापराचे उल्लंघन: 548 जणांकडून 27 लाख 11 हजार रुपये दंड आकारणी

* उघड्यावर कचरा जाळणे : 1 हजार 263 लोकांकडून 7 लाख 9 हजार 100 रुपये दंड आकारणी

* कचऱ्याचे विलगीकरण न करणे: 2 हजार 64 व्यक्तींकडून 4 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल

* स्वच्छ घरगुती कचरा देण्यास नकार:  381 लोकांकडून 12 हजार 940 दंड वसूल

* सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ प्रथा: 30 हजार 129 व्यक्तींकडून 95 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल

* मोठ्या प्रमाणात कचरा जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करणे: 53 व्यक्तींकडून 2 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल ( Pune ) करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.