Pune : ज्येष्ठ महिलांकडे बतावणी करून चोरट्यांनी दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज – स्वारगेट  ज्येष्ठ महिलेला बतावणी करून चोरट्यांनी ( Pune)  दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत   ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीस बंदी

तक्रारदार महिला भवानी पेठेत राहायला आहे. त्या स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकातून निघाल्या होत्या, त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करण्यात येत आहे. तुम्ही दागिने काढून पिशवीत ठेवा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिने, दहा हजारांची रोकड, मोबाईल पिशवीत ठेवण्याचा बहाणा केला. त्यांना बोलण्यात गुंतविले आणि पिशवीतील रोकड, दागिने, मोबाईल असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले.

तसेच पौड रस्त्यावरदेखील ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करून चोरट्यांनी दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोथरूडमधील शिक्षकनगर भागात राहायला आहे. त्या पौड रस्त्याने निघाल्या होत्या. दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यानिमित्ताने मंदिरात बिस्किटांचे पुडे दान करायचे आहेत, अशी बतावणी चोरट्यांनी केली. बिस्किटांचे पुडे, हार व उदबत्तीला सोन्याची अंगठी लावा, अशी बतावणी करून चोरट्यांनी महिलेकडील सोन्याची अंगठी काढून घेतली. 25 हजारांची अंगठी चोरून चोरटे पसार ( Pune)  झाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.