Pune : यशस्वी होण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे गरजेचे – अभिनेते देवेंद्र गायकवाड 

एमपीसी न्यूज – आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे गरजेचे आहे, असे ( Pune ) सांगत विद्यार्थ्यानी कधीही कामाचा कंटाळा करू नये आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावे, असे आवाहन प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या  क्रिसेंडो कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 

देवेंद्र गायकवाड म्हणाले की, एखादा मनुष्य यशस्वी झालेला आपण बघतो, त्याचे आपल्याला कौतुक वाटते, प्रसंगी त्याच्या यशाबद्दल मनात असूया देखील निर्माण होते, मात्र आपण हे विसरतो की, ते यश संपादन करण्यासाठी त्या व्यक्तीने केलेला संघर्ष, कष्ट हे आपल्याला दिसत नसतात, आपल्याला त्याची माहिती नसते.

Chinchwad : भय अस्तित्वात नसून, अज्ञान व चुकांमुळेच निर्माण होते –  डॉ. जयश्री फडणवीस

आपल्याला दिसते ते फक्त यश, वैभव, प्रसिद्धी. त्यामुळे भले तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर करा मात्र त्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा तसेच आपल्या आई- वडिलांना,पालकांना कधीही दुखवू नका, कारण त्यांच्या कष्टामुळेच तुम्ही आज त्यांच्यापेक्षा अधिक चांगले दिवस बघत असतात, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवा,पालकांचे आणि शिक्षकांचे आशीर्वादच तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी संघर्षाची ताकद देतात याची खात्री बाळगा, असा विश्वासही त्यांनी  यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली.

 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. मधुरा देशपांडे यांनी केले. या क्रिसेंडो कार्यक्रमात आयआयएमएस च्या एमबीए व एमसीए विद्याशाखेच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी नृत्य,सामूहिक नृत्य,नाट्यछटा असे विविध कलाप्रकार सादर केले. यावेळी संस्थेतील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रा.युगंधरा पाटील  यांनी समन्वयक म्हणून काम ( Pune ) पाहिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.