Pune : सिंहगड रस्त्यावरील ट्रॅफिक जॅमने पुणेकर त्रस्त

एमपीसी न्यूज- पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू समीकरणच बनले आहे. विद्येच माहेरघर आणि आय टी हब म्हणून पुण्याची ओळख जगभरात आहे. मात्र पुण्याच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. आज सकाळी पुण्यात चाकरमान्याची आठवड्याची सुरुवात वाहतूक कोंडीनेच झाली आहे. सिंहगड रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा सिंहगड रस्त्यावर दिसत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा बंद असली तरी वाहतूक पोलीस आपले काम करत होते त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हायला थोडा वेळ लागणार आहे पण सिंहगड रस्त्यावरील या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.