Pune : अग्निशमन दलाकडून एकाच दिवशी दोन प्राणी आणि एका पक्षाला जीवनदान

एमपीसी न्यूज : पुणे अग्निशमन दलाने (Pune) बुधवार 21 डिसेंबर 2022 रोजी पोपट, गाय व मांजराला जीवनदान दिले. काल सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास एका नागरिकाने नवले येथील अग्निशमन केंद्राला कळवले, की एक जखमी पोपट सिहंगड रोड, लगडमळा येथील झाडावर 50 फुट उंचीवर आहे. त्यामुळे एक अग्निशमन बंब व कर्मचारी तेथे पोहचले. त्यांनी पोपटाला सुखरूप बाहेर काढून त्याला उपचारासाठी रेस्क्यू टिमकडे पाठवण्यात आले आहे.

तसेच, विठ्ठल नगर, एकता नगरी येथे नदीपात्रात एका गाय अडकली असल्याची माहिती सिंहगड रोड अग्निशमन केंद्राला एका नागरिकाने दिली. त्यामुळे एक अग्निशमन बंब व कर्मचारी तेथे पोहोचले. गाय चिखलात अडकली होती. तिला अग्निशमन कर्मचाऱ्यांनी रस्सी व इतर साहित्याच्या मदतीने बाहेर काढले.

Pune : हॉटेल व्यवसायात पार्टनरशिप करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत

धायरी येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक मांजर अडकली असल्याची माहिती एका नागरिकाने नवले येथील अग्निशमन केंद्राला दिली. येथेही तत्परतेने अग्निशमन दल पोहचल्याने मांजरीचा जीव वाचला. एकाच दिवसात तीन प्राण्यांना जीवनदान दिल्याने नागरिकांकडून अग्निशमन दलावर (Pune) कौतुकाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.