Pune : हॉटेल व्यवसायात पार्टनरशिप करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : एका मित्राच्या (Pune) माध्यमातून ओळख झाल्यानंतर हॉटेल व्यवसायात पार्टनरशिप करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. चर्चा करण्याच्या निमित्ताने आरोपीने या महिलेला घरी बोलावले आणि कॉफीतून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केला. पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

अधिक माहिती अशी की, कोरोना काळात आरोपीची नोकरी गेली होती. यावेळी तो दुसरी नोकरी शोधत होता. याच दरम्यान एका कॉमन मित्राच्या माध्यमातून फिर्यादी महिला आणि आरोपीची ओळख झाली होती. फिर्यादी महिला केटरिंगची कामे करते. यातूनच हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी या दोघांची ओळख झाली होती.

PCMC : गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त शाळांमध्ये गणितोत्सव

दरम्यान यासंबंधी चर्चा करण्यासाठीच (Pune) आरोपीने फिर्यादी महिलेला खराडी परिसरातील आपल्या घरी बोलावले होते. यावेळी त्यांनी कॉफीतून गुंगीचे औषध फिर्यादी महिला दिले. ही महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही महिला तिथून निघून आली. त्यानंतर तिने अखेर चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.