Pune Crime : मद्य पाजून डॉक्टरने केला तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : ओळख करून क्लिनिकवर (Pune Crime ) बोलवून मद्य पाजून डॉक्टरने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यात 26 वर्षीय डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका डॉक्टरने महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. डॉक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शुभंकर महापुरे (वय 26) असे गुन्हा दाखल केलेल्या डॉक्टरचे नाव असून 20 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तिची आणि डॉक्टरची सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर त्याने तिच्याशी ओळख (Pune Crime) वाढवली. त्याने 24 सप्टेंबर रोजी रात्री तरुणीला जेवण करण्यासाठी कार्यालयात बोलावून घेतले.
जेवण करण्यापूर्वी त्याने तिला मद्य पाजले. तिला गुंगी आल्यानंतर त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार लक्षात आल्यावर तरुणीने पोलिस ठाणे गाठले.