Pune : प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पुण्येश्वर मंदिराच्या (Pune) मुद्यावरून महापालिकेसमोर नुकत्याच झालेल्या आंदोलनात प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी ज्ञानेश विष्णू माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवाजीनगर पोलिसांनी मिलिंद एकबोटे, कुणाल सोमेश्वर कांबळे, किरण चंद्रकांत शिंदे, विशाल दिलीप पवार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मागील काही दिवसांपासून कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर परिसरातील प्रार्थनास्थळ यावरून वाद सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकबोटे, कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चार सप्टेंबर 2023 रोजी दुपारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते.

या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती (Pune) तरीही या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात कार्यकर्ते जमवून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक भाषणे केली.

Kothrud : मोबाईल शॉपीमधून 52 लाखांचे 200 मोबाईल लंपास

तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केला. याबाबत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या विधी अधिकाऱ्याचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढीलतपास सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.